वित्त आयोगाच्या शिष्टमंडळाकडून पिंपरी चिंचवडच्या विकास प्रकल्पांची पाहणी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/DSCN8671.jpg)
पिंपरी – महापालिकेच्या विविध विकास प्रकल्पांची 15 व्या वित्त आयोगाच्या शिष्टमंडळाकडून पाहणी करण्यात आली. यावेळी त्या शिष्टमंडळाकडून निगडीतील सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुध्दीकरण प्रकल्पास भेट देण्यात आली. तसेच शहराच्या विविध विकास प्रकल्पांची माहिती जाणून घेतली.
महापालिकेचे महापौर राहुल जाधव यांनी शिष्ट मंडळाचे स्वागत केले. यावेळी वित्त आयोगाच्या शिष्ट मंडळात 15 व्या वित्त आयोगाचे प्रभारी अध्यक्ष शक्तीकांत दास, सचिव अरविंद मेहता, सहसचिव मुखमितसिंग भाटिया, वित्त सल्लागार अँथोनी सायरिक, सहाय्यक संचालक प्रविण जैन, सदस्य डॉ. अनुप सिंग, डॉ. अशोक लहिरी, डॉ.रमेश चंद, भरतभुषण गर्ग, डॉ.रवि कोटा यांचा समावेश होता. याप्रसंगी पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप, पुणे मेट्रोचे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक गौतम बि-हाडे, महामेट्रोचे मुख्य निवासी अभियंता श्रीवास्तव, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे उपस्थित होते. दरम्यान, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शिष्ट मंडाळाला शहराची विविध प्रकल्पाची माहिती दिली. तसेच जलशुध्दीकरण केंद्र परिसरात वृक्षरोपणही करण्यात आले.