Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे
‘वायसीएम’ च्या शवविच्छेदन गृहाचा वीजपुरवठा रात्रभर खंडीत
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/06/Pimpari.jpg)
– तब्बल पाच मृतदेह कुजण्याची भिती
– वादळी वा-यात झाड उन्मळून पडल्याने वीज गायब
पिंपरी ( महा ई न्यूज ) – महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील शवविच्छेदन (पोस्ट मार्टम) विभागातील कोल्ड स्टोरेजचा विद्युत पुरवठा खंडित झाला होता. शुक्रवारी झालेल्या वादळी वा-याने शवविच्छेदन गृहाशेजारील झाड पडून हा वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे कोल्ड स्टोरेजमधील पाच मृतदेह कुजण्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे.
शुक्रवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास पावसाने वादळी वाऱ्यासह हजेरी लावली. वाऱ्याच्या तडाख्यामुळे शवविच्छेदन विभागाजवळील झाड उन्मळून पडले. शवविच्छेदन विभागातील विद्युत पुरवठा करणाऱ्या यंत्रणेवर हे झाड पडले. त्यामुळे शॉर्ट सर्किट होऊन या विभागाचा वीज पुरवठा शुक्रवारी रात्रभर खंडित झाला. तसेच शवविच्छेदन विभागातील कोल्ड स्टोरेजचा विद्युत पुरवठाही बंद पडला होता. शवविछेदन गृहात ठेवलेले मृतदेह कुजण्याची परस्थिती उद्भवली होते. या कोल्ड स्टोरेजमध्ये 16 मृतदेह ठेवण्याची क्षमता असून शुक्रवारी रात्री 5 मृतदेह ठेवण्यात आले होते.
याबाबत विभागातील कर्मचाऱ्यांनी शनिवारी (दि. 8) सकाळी मृताच्या नातेवाईकांना मृतदेह देण्यासाठी कोल्ड स्टोरेजचा दरवाजा उघडला. तेव्हा वातानुकूलित यंत्रणा बंद असल्याचे लक्षात आले. त्यांनी तेथील ड्युटीवरील डाॅक्टरांना सांगितले. त्यांनी वायसीएमचे अधिष्ठाता, विद्युत व बायोमेडिकल विभागाला याविषयी कळविळे. विद्युत विभागाच्या कर्मचा-यांनी अथक परिश्रम करुन खंडीत झालेला वीज पुरवठा तब्बल 14 तासाहून अधिक वेेळेनंतर सुरळीत केला. तोपर्यंत तेथील मृतदेहाची अवस्था बिकट झाली होती.
दरम्यान, वायसीएम रुग्णालयातील शव विच्छेदनमधील कोल्ड स्टोरेजचा विद्युत पुरवठा खंडित झाला होता. शुक्रवारी झालेल्या वादळी पावसात झाड पडून हा वीजपुरवठा खंडित झाला. आता हा पुरवठा सुरळीत केला आहे, असे वायसीएमचे अधिष्ठाता डॉ. आर. वाबळे यांनी सांगितले.