Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
वाणी समाज प्रबोधन संस्थेतर्फे रहाटणीत मान्यवरांचा होणार सन्मान
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/images-3.jpg)
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पिंपरीतील अखिल महाराष्ट्र वाणी समाज प्रबोधन संस्था आणि महिला मंडळ व युवा मंडळाच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेल्या मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे. रहाटणी येथील थोपटे लॉन्स येथे उध्या रविवारी (दि. 28) सायंकाळी साडेचार वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नागनाथ कोतापल्ले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहतील. पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, सेवा विकास बँकेचे चेअरमन अमर मुलचंदानी, एकोणीस वर्षाखालील भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार पवन शहा, संमोहन तज्ञ डॉ. विष्णू माने, अखिल महाराष्ट्र वाणी समाज प्रबोधन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुनील नेरकर, संस्थेचे प्रदेशाध्यक्ष सुरेश शिरुडे, सेवा विकास बँकेचे संचालक चंद्रशेखर आहेरराव, राजू सावंत, प्रबोधन संस्थेचे राष्ट्रीय संघटक दीपक येवले, शहराध्यक्ष किरण अमृतकर, महिला शहराध्यक्षा भारती दशपुते, पिंपरी-चिंचवड युवा अध्यक्ष स्वप्निल पाचपुते आदी यावेळी उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, समाजबांधवांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन प्रबोधन संस्थेचे प्रवक्ते प्रा. उदय पाटकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.