breaking-newsपिंपरी / चिंचवड
वाढदिवसानिमित्त पिंपरी युवासेनेतर्फे सामाजिक उपक्रम
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/IMG-20201015-WA0005.jpg)
पिंपरी / महाईन्यूज
पिंपरी युवा सेनेच्या वतीने अजिंक्य रामभाऊ उबाळे ह्यांच्या वाढदिवसानिमित्त फुगेवाडी, दापोडीमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. गरीब विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या. यावेळी शिवसेना जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, रवी कांबळे, अविनाश जाधव, महेश बोधले, सागर गायकवाड, दीपक साळवे उपस्थित होते. कार्यक्रमचे आयोजन युवासेना पिंपरी विभाग संघटक निलेश हाके यांनी केले होते.