breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

वाकड महामार्गावर खासगी ट्रॅव्हल्स व ट्रकचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू

पिंपरी |महाईन्यूज|

कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावर वाकड ब्रिजजवळ मुंबई मार्गावर खासगी बस व ट्रकचा भीषण अपघात झाला. यात बसमधील क्लीनरचा मृत्यू झाला असून 8 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात आज सोमवारी (दि.11) पहाटे झाला.

बजरंग गायकवाड (वय 35) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. 8 जखमी प्रवाशांपैकी 6 जणांना औंध रुग्णालयात तर 2 प्रवाशांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खासगी ट्रॅव्हल्स कंपनीची एक बस उदगीर येथून मुंबईला जात होती. पहाटे चारच्या सुमारास कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावर वाकड ब्रिजजवळ बस व मालवाहतूक ट्रकचा भीषण अपघात झाला. पावणे पाचच्या सुमारास या घटनेची माहिती अग्निशमन विभागाला मिळाली.

त्यानुसार मुख्य अग्निशमन विभागाची एक व राहटणी उपविभागाची एक गाडी घटनास्थळी दाखल झाली. जवानांनी जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. जखमींवर उपचार सुरू आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button