वाकड परिसरातील ‘स्पा’ सेंटरवर पोलिसांचा छापा; दहा महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका
![Exposed prostitution under the name of Spa Center at Hinjewadi IT Park](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/Sex-rackeT-Frame-copy-2.jpg)
पिंपरी | महाईन्यूज
‘स्पा सेंटर’वर छापा मारून दहा महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका करण्यात आली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. शनिवारी (दि. ७) रात्री साडेसातच्या सुमारास वाकड-हिंजवडी मार्गावरील व्हाईट स्क्वेअर मॉलमधील ‘कनक स्पा सेंटर’ हिंजवडीपोलिसांनी ही कारवाई केली आहे.
महिला पोलीस उपनिरीक्षक वषार्राणी घाटे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार विशाल पवनकुमार अगरवाल (वय ४०, रा. मोहननगर, चिंचवड), वंदना ज्ञानोबा अडागळे (वय ३६, रा. कर्वेनगर, कोथरूड) यांना अटक करण्यात आली आहे. वाकड-हिंजवडी रोडवर असलेल्या व्हाईट स्क्वेअर मॉलमध्ये ‘कनक स्पा सेंटर’ आहे. त्या सेंटरमध्ये दोन आरोपी काही महिलांना मसाज आणि वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त करत असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी त्या ‘सेंटर’वर छापा टाकला. त्यातून १० महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका केली. तसेच सेंटर चालवणाठया दोघांना अटक केली आहे.