breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

लोणावळ्यात काही मार्गांवर अवजड वाहनांना पोलिसांनी घातली बंदी

पिंपरी, (महाईन्यूज) – लोणावळा येथे वर्षावाहिरासाठी येणा-या पर्याटकांची गर्दी वाढत असल्यामुळे भुशी धरण आणि लायन्स पॉईंटकडे जाणा-या मार्गावर शनिवारी आणि रविवारी अवजड वाहने आणि खासगी बसेसला बंदी घालण्यात आली आहे. तरी, पर्यटकांनी याबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत.

लोणावळा परिसरात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे वर्षाविहारासाठी पर्यटकांची गर्दी वाढत आहे. शनिवार आणि रविवार सुट्टीच्या दिवशी याठिकाणी मोठी गर्दी होत आहे. वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. कोंडी फोडण्यासाठी भुशी धरण आणि लायन्स पॉईंटकडे जाणा-या मार्गावर अवजड वाहने आणि पर्यटकांची वाहतूक करणा-या खासगी बसेसना शनिवारी आणि रविवारी बंदी घालण्यात आली आहे. शनिवारी सकाळपासूनच त्याची अंमलबजावनी करण्यात आली आहे. याबाबत पर्यटकांनी व वाहनचालकांनी खबरदराची घेण्याच्या सूचना पोलिसांनी केल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button