लोणावळा-पुणे लोकलच्या विलंबामुळे प्रवाशांना नाहक त्रास
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/06/Pune-local.jpg)
पिंपरी – लोणावळा ते पुणे लोकलच्या विलंबामुळे अनेक चाकरमानी नागरिकांसह विद्यार्थ्यांचा खोळंबा होवू लागला आहे. अनेकदा लोकल उशिरा धावत असल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे आज (शुक्रवारी) अनेक स्टेशनावर प्रवाशांनी लोकल थांबवून त्याचा रोष व्यक्त केला आहे.
नोकरदार प्रवाशांनी वर्गाने पिंपरी रेल्वे स्थानकावर लोणावळा-पुणे ही तब्बल १५ मिनिटं थांबवून आपला संताप व्यक्त केला. ते तेवढ्यावरच थांबले नाहीत प्रवाशांनी अगोदर चिंचवड, पिंपरी, कासारवाडी आणि दापोडी येथे लोकल थांबवली होती अशी माहिती रेल्वे कर्मचाऱ्यानी दिली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात आणि पुणे येथे अनेक नागरिक, तरुण हे शिक्षणासाठी आणि कामासाठी दाखल होतात. पर्याय म्हणून ते रेल्वेने प्रवास करत असतात. परंतु, रेल्वेच्या ढिसाळ कारभाराचा फटका अनेक नोकरदार वर्गाला आणि विद्यार्थाना बसला आहे.
लोकल कधीच वेळेवर येत नसल्याची ओरड प्रवाश्यांमध्ये आहे. प्रवाशी वेळवेवर पाहिजे त्या ठिकाणी पोहचत नसल्याने आज सकाळी लोणावळा-पुणे लोकल रेल्वेवर नागरिकांनी संताप व्यक्त केला. लोणावल्यावरून निघालेली साडे नऊची लोकल नागरिकांनी चिंचवड येथे काही मिनिटं त्यानंतर पिंपरी रेल्वे स्थानकात १५ मिनिटं तर कासारवाडी, दापोडी येथे काही मिनिटं अडवून धरली होती. अशी माहिती रेल्वे कर्मचाऱ्यानी दिली आहे.