लोकशाहीत कुटूंबशाही चालणार नाही, त्याला आम्ही गाडणार – प्रकाश आंबेडकरांचा इशारा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/20190128_204819.jpg)
राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार पार्थ पवारांवर आंबेडकरांनी साधला निशाना
पिंपरी ( महा ई न्यूज ) – सध्या मावळ लोकसभा निवडणुकीत नात्या-गोत्यांचे राजकारण चालू आहे. काही निवडक मराठा नेत्यांच्या हातात सत्ता केंद्रे आहेत. तीच लोक सर्वांना वेठीस धरु लागली आहेत. त्यामुळे आजही वंचित बहुजनांना दुर्लक्षित करुन घराणेशाही राबवून सत्ता हस्तगत करु लागले आहेत. मात्र, लोकशाहीत कुंटूबशाही चालणार नाही. कर्तबगार माणूसच निवडणुक लढवून तो निवडून आला पाहिजे, शिवाय भविष्यात कुटूंबशाही आम्ही गाडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते तथा भारिपचे अध्यक्ष अॅड प्रकाश आंबेडकर यांनी दिला.
पिंपरीतील हिंदुस्थान अॅन्टीबायोटिक्सच्या मैदानावर वंचित बहुजन आघाडीची मावळ लोकसभेसाठी सत्ता संपादन सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील, भारिप प्रदेशाध्यक्ष अशोक सोनावणे, माजी आमदार लक्ष्मण माने, सचिन माळी, नवनाथ पडळकर, देवेंद्र तायडे, अकिल मुजावर आदी उपस्थित होते. यावेळी भारतीय संविधानातील मार्गदर्शक तत्वे ही मुलभूत अधिकार करावेत, असा ठराव मांडण्यात आला.
आंबेडकर म्हणाले की, माझा विकास झाला नाही की मागा आरक्षण, आता हे आरक्षण खिरापत झाले आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे शिक्षण देण्यास सरकार कमी पडत आहे. भाजप सरकार हे संविधानाची समिक्षा करण्यास निघाल्याचे 2014 मध्ये आरएसएसच्या पोटातील ओठावर आले. आम्हाला सत्ता मिळाल्यास पहिल्यादा संघाला संविधानाच्या चाैकटीत आणेन, त्याचे संविधानाला समांतर सरकार चालविण्याचे उद्योग बंद करेन. डोंंबविलीत संघाच्या व भाजप उपाध्यक्षाकडे हत्यारे सापडली तरीही तो देशभक्त आहे. पण आमच्या मुस्लिमाकडे सापडल्यावर तो आतंकवादी, दलित व आदिवाशांकडे सापडल्यास तो माओवादी, नक्षलवादी असल्याचे पोलिस लगेच घोषित करतात. त्यामुळे ही आरएसएसचं आतंकवादी संघटना असल्याचे टिका त्यांनी केली.
तसेच 70 वर्षे सत्तेपासून वंचित बहुजन समाज दुर राहिला. हा समाज आता संघर्ष करायला लागला की लगेत त्याचा पोटात गोळा आलाय. हा घटक शेकडो दशके सत्ता, अधिकार, हक्क, विकासापासून वंचित राहिला. आता बस्स झाले आमची मान, ही आमच्या खाद्यावर ठेवून आमची सत्ता आम्ही मिळवणार आहे. पुणे हे सत्तेचे माहेर घर आहे. या माहेर घरात मावळात कित्येक आदिवाशी पाड्यात कुपोषित बालके दगावली जातात. तसेच काही कुपोषित म्हणून राहत आहेत. तरीही महाराष्ट्राचा जाणता राजा त्या लेकरांची जाणिव राहिलेली नाही. आता आमच्या शोषणांचा अंत पाहू नका, आम्ही सत्ता मिळवूनच विकास करुन दाखवू, असेही यावेळी म्हणाले.