breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

लोकनेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर

पिंपरी |महाईन्यूज|

महाविकास आघाडीचे शिल्पकार व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरदचंद्रजी पवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त भोसरी येथील पीएमटी चौकात रक्तदान शिबिर घेण्यात आले. यामध्ये 125 युनिट रक्‍त संकलित केले आहे. करोना काळात रक्‍ताचा तुटवडा निर्माण झाला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आवाहनानंतर रक्‍तदान शिबिर आरोग्यदायी उपक्रम घेण्यात आला. याचे उद्‌घाटन खासदार अमोल कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, सामाजिक कार्यकर्ते पंडित गवळी, नगरसेवक अजित गव्हाणे, माजी नगरसेवक जालिंदर बापू शिंदे, माजी शिक्षण सभापती विजय लोखंडे, योगेश गवळी, काशिनाथ जगताप आदी यावेळी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button