breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

लॉकडाऊनसाठी पिंपरी-चिंचवडमध्ये पुढचे दहा दिवस 56 ठिकाणी नाकाबंदी; तर 13 ठिकाणी चेकनाके

पुण्यातील वाढती कोरोनाची रुगण संख्या पाहता पुण्यात आणि पिंपरीचिंचवडमध्ये पुन्हा एकदा दहा दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे . हा लॉकडाऊन आज 13 जूनच्या मध्यरात्रीपासून सुरु होणार आहे. दरम्यान, या लॉकडाऊनसाठी पिंपरी-चिंचवड शहर पोलीस सज्ज झाले आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये पुढचे दहा दिवस 56 ठिकाणी नाकाबंदी तर 13 ठिकाणी चेकनाके असणार आहेत.

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडमध्ये 1 पोलीस आयुक्त, 1 अप्पर पोलीस आयुक्त, 3 पोलीस उपायुक्त, 3 सहाय्याक पोलीस आयुक्त, 25 पोलीस निरीक्षक, 2000 पोलीस कर्मचाऱ्यांचा फौजफाटा शहरातील विविध भागात तैनात करण्यात आला आहे.नाकाबंदी असणाऱ्या प्रत्येक ठिकाणी 1 अधिकारी 3 कर्मचारी 2 ट्राफिक कर्मचारी असणार आहेत. तर चेकनाक्यावर 1 अधिकारी, 4 कर्मचारी 2 सशस्त्र पोलीस कर्मचारी असणार आहेत.

पुण्यात लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर 14 ते 18 जुलैपर्यंत सर्व किराणा दुकानं पूर्णपणे बंद राहणार आहेत. त्यानंतर 19 ते 23 जुलैपर्यंत सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेची दुकानं सुरु राहणार आहेत. दरम्यान, 13 ते 23 जुलै या दहा दिवसात सर्व उद्याने आणि क्रीडांगणे बंद राहणार आहेत. याशिवाय दहा दिवस हॉटेल्स आणि लाँजदेखील बंद राहणार आहेत. पेट्रोल पंप आणि गॅस पंप सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत सुरु राहतील.

दरम्यान, सरकारच्या वंदे भारत योजनेअंतर्गत येणारे उपहारगृह, बार, लाँज आणि हॉटेल वगळता सर्व रिसॉर्ट, मॉल, बाजार, मार्केट पूर्णपणे बंद राहणार आहेत पुण्यात दहा दिवस सर्व सलून दुकानं, स्पॉ, ब्युटी पार्लर पूर्णपणे बंद राहतील.

14 ते 18 जुलै या पाच दिवसात भाजी मार्केट, फळ मार्केट, आठवडी बाजार, फेरीवालेही पूर्णपणे बंद राहणार आहेत. तर 19 ते 23 जुलैदरम्यान सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत भाजी मार्केट सुरु राहतील.

मटन, चिकन, अंडी यांची विक्री 14 ते 18 जुलै या पाच दिवसात पूर्णपणे बंद राहील. त्यानंतर पुढचे पाच दिवस सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत मटन, चिकन, अंडी यांची विक्री सुरु राहणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button