breaking-newsपिंपरी / चिंचवड

लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणा-या तरुणींची नस कापून केला आत्महत्येचा प्रयत्न

पिंपरी – लिव्ह इन रिलेशनशीपमधून विभक्त झालेल्या तरूणीच्या हाताची नस चाकूने कापून जीवे मारण्याचा प्रयत्न तिच्या प्रियकराने केला. तसेच स्वतःच्या हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी (ता. १२) सायंकाळी सहाच्या सुमारास पिंपळे सौदागरमध्ये घडली. 

अमीर इन्तियाज मुंशी (वय २९, गारमळा कॉलनी, नखाते वस्ती, रहाटणी, मुळ रा. नालासोपारा, मुंबई) असे तिच्या प्रियकराचे नाव असून त्याच्याविरोधात सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी तरूणी व अामीर हे सुमारे दीड वर्षे लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते. मात्र, काही दिवसांपूर्वी तरूणी विभक्त राहू लागली. तिला लग्न करायचे नव्हते तरी अामीर तिच्याकडे सतत लग्नाचा तगादा लावत होता. सोमवारी अामीर तिच्या घरी आला तेव्हा तिने लग्नाला नकार दिल्याने त्यांच्यात वाद झाला. त्यावेळी अामीर याने तिच्या हाताची नस चाकूने कापून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तर स्वतःची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. दरम्यान, त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी तरूणी एका मेडीसिन कंपनीत उच्च पदावर नोकरीस आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button