लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार; वाकड पोलिसांत गुन्हा दाखल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/rape-1-1.jpg)
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार करणा-या तरुणावर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार मंगळवारी (दि. 2) रात्री साडेअकराच्या सुमारास उघडकीस आला आहे.
परशुराम लक्ष्मण मोगल (वय 26, रा. तळोदा रांजणी, नंदुरबार) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने वाकड पोलिसांत तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परशुराम आणि तक्रारदार तरुणी 2017 मध्ये एकमेकांच्या संपर्कात आले. त्यांच्यातील संबंध दृढ होत गेल्याने परशुरामने तरुणीला लग्नाचे वचन दिले. तरुणीनेही त्याच्यावर विश्वास ठेवला. दरम्यान, दोघांमध्ये शारिरीक संबंध प्रस्थापित झाले. 2017 ते 4 मे 2018 दरम्यान दोघे अनेकदा एकमेकांच्या संपर्कात आले. मात्र, दोघांमधील या नात्याला तडा गेल्याने पीडित तरुणीने परशुरामवर लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा ठपका ठेवला. त्याच्या विरोधात पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. परशुरामवर बालात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. वाकड पोलीस तपास करत आहेत.