breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘रोडस्वीपर’ रस्ते साफसफाई; ठेकेदारांचे हित जपणारी निविदा रद्द करा – खासदार अमोल कोल्हे

आयुक्त श्रावण हर्डिकर यांना पत्र, सुमारे ११०० कामगारांवर बेकारीची कु-हाड

पिंपरी |महाईन्यूज |प्रतिनिधी|

पिंपरी-चिंचवड महापालिकेने यांत्रिकी पद्धतीने रस्ते सफाईची निविदाप्रक्रियेवरून वाद सुरु आहेत. त्यात आता शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्डे यांनीही लक्ष घातले आहे. त्यांनी ही निविदा संशयास्पद वाटत असून ठेकेदारांचे हित जपणारी व भ्रष्टाचाराला वाव देणारी आहे. त्यामुळे ती तातडीने थांबवावी, या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करावी, असे पत्र महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिले आहे.

खासदार डॉ. कोल्हे यांनी या पत्रात म्हटले आहे की, महापालिका हद्दीतील रस्ते यांत्रिकी पद्धतीने साफसफाई करण्यासाठी ६४७ कोटी इतक्या रकमेची निविदा प्रशासनाने प्रसिद्ध केली आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी करणारी व सुमारे ११०० कामगारांना बेरोजगार करणाऱ्या निविदेबाबत वर्तमानपत्रात सातत्याने चर्चा होत आहेत. पालिकेचा आर्थिक फायदा होईल, असे सांगितले जात असताना प्रत्यक्षात ठेकेदारांना डोळ्यासमोर ठेवून संशयास्पद पद्धतीने ही निविदेची नियमावली बदलण्यात आली आहे.

यासह सहा पॅकेजसाठी केवळ सहाच ठेकेदार सहभागी असल्याने निविदा प्रक्रियेत रिंग होणार, हे दिसून येत आहे.या निविदेवरून विविध प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे ठेकेदारांचे हित जपणारी व भ्रष्टाचाराला वाव देणारी निविदा प्रक्रिया तातडीने थांबवावी. तसेच. या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करून दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अन्यथा राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे हस्तक्षेप करून कारवाईची मागणी करावी लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत योजनेच्या नावाखाली या प्रकारे जनतेच्या पैशांची उधळपट्टी होत असल्यास केंद्राकडेही तक्रार करावी लागेल, असेही कोल्हे यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button