रेडझोनमध्ये नवीन कामे होणार नाहीत – आयुक्त श्रावण हर्डिकर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/pimpri-chinchwad.jpg)
मॅगझीन उद्यानाचा ठराव विखंडीत होणार
पिंपरी – नद्या, पूररेषा, रेडझोन परिसराचे क्षेत्र निर्धारित करण्यात आले आहे. महापालिका हद्दीतील आरक्षित जागेवर नवीन विकास कामांसाठी कोणताही निधी खर्च करता येणार नाही. तसा आदेश यापुर्वीच महापालिकेच्या सर्व विभागांना दिलेला आहे. त्यामुळे भोसरी-आळंदी रोडवरील मॅंगझीन चाैकातील उद्यान विकसित करण्यासाठी स्थायी समितीने केलेला ठराव रद्द करण्याची नामुष्की भाजपवर येणार आहे.
भोसरी-आळंदी रोडवरील मॅगझीन चाैकातील उद्यान विकसित करण्यात येत आहे. महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 31 मधील रेडझोन हद्दीतील उद्यान विकसित करण्यासाठी स्थापत्य उद्यान विभागाने निविदा प्रक्रिया राबविली आहे. याकरिता सन 2017-18 मधील निविदा रक्कम 36 लाख 86 हजार 314 रुपये असून कामाची मुदत 9 महिन्यांची ठेवली आहे. याकरिता चार निविदा प्राप्त झाल्या होत्या. यापैकी मे.डी.जे.एंटरप्रायझेस यांनी निविदा रक्कम 36 लाख 86 हजार 314 रुपये पेक्षा 26.27 टक्के कमी दराने म्हणजे 27 लाख 17 हजार 919 पर्यंत काम करुन देण्यास निविदा भरली आहे. संबंधित ठेकेदाराने तुलनात्मकदृष्ट्या वाजवी दराची निविदा असल्याने ठेकेदार मुदतीमध्ये कामे करुन घेतली जाणार आहे.
दरम्यान, महापालिकेच्या स्थापत्य उद्यान विभागाला रेडझोनला कुठलेही काम करता येणार नाही. परंतू, नागरिकांच्या मुलभूत सोयीं-सुविधांची आणि काही देखभालीचे कामे करता येवू शकताता. त्यामुळे लोकप्रतिनिधींच्या पत्रानूसार स्थापत्य विभागातील कार्यकारी अभियंत्याने आयुक्तांचे आदेश डावलून रेडझोनमधील उद्याने विकसित करण्यास लगाम लागणार आहे. तसेच त्या विषयावर स्थायी समितीने कुठलीही चर्चा न करता हा विषय मंजूर केला होता. तो ठराव देखील भाजपच्या स्थायी समितीला रद्द करावा लागणार आहे.