Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

रिक्षाचालक तरुणावर वार

 रिक्षाचालक तरुणावर अज्ञात इसमाने वार केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना रविवारी (दि. 13) सायंकाळी पाचच्या सुमारास काळेवाडी येथे घडली.

गणेश कमलाकर शेलके (वय 28, रा. काळेवाडी) याने याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात हल्लेखोराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश हा रिक्षा चालविण्याचे काम करतो. रविवारी सायंकाळी तो रिक्षा दुरुस्त करण्यासाठी काळेवाडी येथील बुद्धविहार समोर थांबला होता. रिक्षा दुरुस्त करण्याचे काम सुरु होते. अचानक एका हल्लेखोराने गणेशवर सत्तूरने वार केला. वार चूकविण्यासाठी गणेशने हात आतमध्ये घातला. त्यावेळी त्याच्या डाव्या हाताच्या मनगटावर वार झाला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. हल्लेखोराने तोंडाला रुमाल बांधला असल्याने त्याचा चेहरा ओळखता आला नाही. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button