राष्ट्रवादी काँग्रेस लिगल सेलच्या भोसरी विधानसभा अध्यक्षपदी उद्योजक विशाल जाधव यांची निवड
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/Screenshot_20200617_133228.jpg)
पिंपरी| महाईन्यूज | प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवड लिगल सेलच्या भोसरी विधानसभा अध्यक्षपदी जाधववाडी, चिखली येथील उद्योजक व अडव्होकेट विशाल जाधव यांची आज (सोमवारी) निवड करण्यात आली आहे. त्यांना निवडीचे पत्र शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी विरोधी पक्षनेते नाना काटे, महिला शहराध्यक्षा वैशालीताई काळभोर, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, लिगल सेलचे अध्यक्ष गोरक्ष लोखंडे, राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष विशाल वाकडकर, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष सुनिल गव्हाणे व पदाधिकारी उपस्थित होते.
पक्ष संघटना विस्तार करण्यासाठी आदरणीय शरद पवार व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार याचे विचार तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी यशस्वी प्रयत्नशील असा विश्वास व्यक्त करत विशाल जाधव यांना निवडीचे पत्र शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी देऊन अभिनंदन केले.