Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे
राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी रुपाली चाकणकर यांची नियुक्ती
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/rupali-chakankar-b1.jpg-2.jpg)
पिंपरी, (महाईन्यूज) – राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी पदाचा राजीनामा देऊन भाजपकडे वाटचाल केल्याने त्यांच्या जागी पुण्याच्या माजी महिला शहराध्यक्षा रुपाली चाकणकर यांची नियुक्ती झाली आहे.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चाकणकर यांची नियुक्ती केली आहे. यावेळी राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण, पुणे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारठकर उपस्थित होते.
चाकणकर यांनी पुणे शहर महिला अध्यक्षपदाची धुरा सक्षमपणे सांभाळली आहे. त्यांच्यातील आक्रमकता आणि मुत्सद्दीपणा पाहून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांच्याकडे राज्याची धुरा सोपविली आहे.