breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

राष्ट्रवादीचे पार्थ पवार यांचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी शिवसेनेने नैतिकतेची मर्यादा ओलांडली

  • शिवसेनेकडून ‘त्या’ तरुणींचा अवमान…खासगी आयुष्यात डोकावल्याने महिला वर्गात संताप!
  • खासगी जीवनातील फोटो व्हायरल करून ‘त्या’ तरुणींचे आयुष्य उद्धवस्त करण्याचा प्रयत्न
पिंपरी- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी महिलांचा कायम सन्मान केला. मात्र, त्याच शिवरायांचे नाव घेऊन राजकारण करणाऱ्या शिवसेनेने आपली वैचारिक दिवाळखोरी सिद्ध केली आहे. राजकीय द्वेष भावनेतून राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या महाविद्यालयीन जीवनातील मित्र-मैत्रिणींसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. मात्र, या सर्व चढाओढीत संबंधित तरुणींची नाहक बदनामी झाली. अक्षरशः ‘त्या’ तरुणींचे सार्वजनिक आयुष्य उद्धवस्त झाले. याला जबाबदार कोण ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मावळ लोकसभा मतदार संघातील निवडणूक शिवसेना आणि उमेदवार श्रीरंग बारणे यांनी प्रतिष्ठेची केली आहे. या मतदार संघातील सहापैकी पाच विधानसभा मतदार संघात विरोधी पक्षाचे खासदार आहेत. गेल्या १५ वर्षात ही जागा राष्ट्रवादीला मिळवता आली नाही.  त्यामुळे पवार कुटुंबियांकडे उमेदवारी घेऊन एकप्रकारे मोठी जोखीम पार्थ पवार यांनी स्वीकारली. त्यामुळे गट-तट विसरून संपूर्ण राष्ट्रवादी एकदिलाने कामाला लागली. काँग्रेस, शेकाप आणि महाआघाडीला सर्व मित्र पक्षांनी सक्षम प्रचार यंत्रणा राबवली. परिणामी, शिवसेना आणि त्यांचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना
पराभव डोळ्यांसमोर दिसू लागला आहे. महाराष्ट्रच्या अन्य मतदार संघातही राष्ट्रवादीचे पर्यायाने पवार कुटुंबियांचे पारडे जड होताना दिसत आहे. त्यामुळे सैरभैर झालेल्या शिवसेना आणि उमेदवार बारणे यांनी पार्थ पवार  यांच्या महाविद्यालय जीवनातील खासगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. मित्र-मैत्रिणींसोबत पार्टी करीत असताना त्याला अनैतिक विचारांचा मुलामा देण्यात आला. या सर्व प्रकारामुळे पार्थ पवार यांची बदनामी तर झालीच, पण त्या फोटोतील तरुणींचे आयुष्य उद्धवस्त केले आहे. पार्थसोबत कोण तरुणी आहेत, यावर जास्त चर्चा होताना दिसत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील संबंध महिला वर्गात शिवसेना आणि बारणे यांच्याविषयी असंतोष व्यक्त होत आहे.
वास्तविक, शिवसेना राजपुत्र आदित्य ठाकरे यांच्या खासगी जीवनातील बाबी अवघ्या महाराष्ट्राला ज्ञात आहेत. मावळचे  सेना खासदार बारणे यांचे सुपुत्र विश्वजित यांनीही महाविद्यालयीन जीवनात ‘मैत्री’ जपली असावी आणि त्यात गैर वाटावे असे काहीच नाही. मात्र, आदित्य ठाकरे यांनी केलेली मैत्री आणि पार्थ पवार यांनी केलेले अनैतिक कृत्य असा सोईस्कर अर्थ लावला जात आहे.
बारणे यांच्यावर पोलिस ठाण्यात वेगवेगळे तीन गुन्हे दाखल आहेत. दोन दिवसांपूर्वी शिवसेना चिंचवड विधानसभा अध्यक्षावर जमीन व्यवहार फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.   याउलट, पार्थ पवार हे उच्चशिक्षीत आणि निष्कलंक उमेदवार आहेत. गेल्या दहा वर्षात शिवसेनेला वैतागलेल्या नागरिकांनी या स्वच्छ व निष्कलंक चेह-याचा स्वीकारही केला आहे. परिणामी, शिवसेना आणि बारणे यांना स्वतःचा पराभव समोर दिसू लागला आहे. त्यामुळे नैतिक पातळी सोडून अपप्रचार केला जात आहे. आरोप केले जात आहेत.
पार्थ पवार यांचे जे फोटो व्हायरल केले जात आहेत. त्यामध्ये एकप्रकारे चार तरुणींच्या खासगी आयुष्यात डोकावण्याचा किळसवाणा प्रकार केला आहे. राजकीय स्वार्थासाठी ‘त्या’ तरुणींना का वेठीस धरले? असा प्रश्न महिला वर्गातून उपस्थित केला जात आहे. वैयक्तिक जीवन जगताना आता तरुण- तरुणींनी शिवसेनेकडून चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र घ्यावे का? की आपल्या घरी माता- भगिनी आहेत. त्यांच्या वैयक्तिक बाबी आशा कोणी चव्हाट्यावर मंडल्या तर योग्य होईल का? असा सवाल महिला मतदार करताना दिसत आहेत.
******
…तर सामाजिक असंतोष निर्माण होईल!
माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणूक लढत असताना आजवरच्या राजकीय जीवनात कोणाच्याही व्यक्तिगत आयुष्यात डोकावण्याचा प्रयत्न केला नाही. याउलट, विकासाच्या मुद्यावर राजकारण केले. ग्रामीण भागातील बोलीभाषा जाहीर भाषणात वापरल्यामुळे अजित पवारांवर अनेकदा नाहक टीका झाली. परंतु, विकासाच्या मुद्यांवर निवडणूक प्रचार सुरू असताना शिवसेना आणि त्यांच्या उमेदवारांकडून नैतिक भान जपले जात नाही. परिणामी, सोशल मीडियावर राष्ट्रवादी आणि शिवसेना दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते भिडलेले आहेत. शिवसेना युवा प्रमुख आदित्य ठाकरे यांचेही वैयक्तिक जीवनातील फोटो काही ठिकाणी व्हायरल होताना दिसत आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर झालेला आरोप-प्रत्यारोपाचे परिणाम दोन्ही पक्षांचा कार्यकर्त्यांमध्ये हातघाईवर येण्याची शक्यता आहे. त्यातून वाद शिगेला पोहोचून सामाजिक असंतोष निर्माण व्हायला वेळ लागणार नाही, अशी खंत सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.
Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button