राज्य सरकारच्या “माझे कुटुंब माझी जबाबदारी” मोहिमेसाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा – आमदार लक्ष्मण जगताप
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/IMG-20200919-WA0008.jpg)
सांगवी, बिजलीनगर, भोसरी येथे मोहीमेचा आजपासून प्रारंभ
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
कोविड १९ नियंत्रणासाठी तसेच मृत्युदर कमी करण्यासाठी व कोविड मुक्त महाराष्ट्र मोहिमे अंतर्गत “माझे कुटुंब माझी जबाबदारी” ही मोहिम राबविण्याची सुचना राज्य शासनाने दिली असून त्या अंतर्गत गृहभेटी देवून नागरिकांना आरोग्य शिक्षण व त्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.
कोरोना महामारीची साखळी तोडण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात “माझे कुटुंब माझी जबाबदारी” ही मोहीम महापालिकेच्या वतीने राबविण्यात येत आहे. या मोहिमेसाठी नागरिकांनी स्वतः हुन पुढाकार घेऊन मनात कोणताही संकोच न करता आपल्या बरोबरच आपल्या कुटुंबांची तपासणी करून घ्यावी. तसेच प्रत्यक्ष गृहभेट देणाऱ्या महापालिकेच्या टीमला सहकार्य करुन ही मोहीम यशस्वीपणे राबवावी, असे आवाहन आमदार लक्ष्मण जगताप यांनी नागरिकांना केले.
सांगवी येथे प्रत्यक्ष गृहभेट घेवून माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेचा प्रारंभ आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते आज करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला उपमहापौर तुषार हिंगे, नगरसेवक संतोष कांबळे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील़, अति. आरोग्य वैदयकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, महिला वैदयकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, सांगवी रुग्णालयाच्या प्रमुख डॉ. विनया आंबेडकर, सहा.आयुक्त अण्णा बोदडे, संदिप खोत, सिनेट सदस्य संतोष ढोरे आदी उपस्थित होते.
त्याचप्रमाणे, “माझे कुटुंब -माझी जबाबदारी” या कार्यक्रमाचा प्रभाग क्र. 17 शिवनगरी, बिजलीनगर येथून ही आज शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमासाठी गृहभेट देवून तपासणी करणाऱ्या तीन सदस्यीय टीम नेमण्यात आल्या असून या टीमद्वारे सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांच्या कुटुंबाची तपासणी करून अभियानाची सुरुवात झाली. या कार्यक्रमावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, ब प्रभाग अध्यक्षा करुणा चिंचवडे, नगरसेवक राजेंद्र गावडे, बाळासाहेब ओव्हाळ, सुरेश भोईर, मोरेश्वर शेडगे, स्वीकृत सदस्य बिभीषण चौधरी, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, प्रशासन अधिकारी अण्णा बोदडे, ब प्रभाग अधिकारी प्रशांत जोशी, डॉ. सुनील जॉन, डॉ. विनादेवी गंभीर, डॉ. किशोरी नलावडे, डॉ. प्रियांका सर्वज्ञ, आदेश नवले, योगेश चिंचवडे, प्रमोद चौधरी, शंकर पाटील, प्रदीप पटेल, कैलास रोटे, वसंत नारखेडे, संजय माळी आदी उपस्थित होते.
भोसरी येथे स्थायी समिती सभापती संतोष अण्णा लोंढे यांच्या उपस्थितीत ही मोहिम सूरू करण्यात आली. यावेळी अति. वैदयकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, ज्येष्ठ वैदयकीय अधिकारी डॉ. शैलेजा भावसार, सहा. आयुक्त बाळासाहेब खांडेकर आदी उपस्थित होते.