रमजान म्हणजे आत्मशुध्दी व मन:शांतीचा मानवतावादी मार्ग – आमदार चाबुकस्वार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/06/IMG-20190601-WA0004.jpg)
पिंपरी, (महाईन्यूज) – मानवतावादी कल्याणाचा मार्ग आत्मशुध्दी व मन:शांतीतून रमजानद्वारे प्राप्त होत असल्याने जगात या पवित्र दिवसाचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याची भावना आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांनी आज येथे व्यक्त केली.
पिंपरीतील लिंकरोड येथील मुस्लिम कब्रस्तान मस्जिद येथे आयोजित इफ्तार पार्टीमध्ये ते बोलत होते. पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन, भारतीय कामगार सेनेचे उपाध्यक्ष इरफान सय्यद, हाजी दस्तगीर यांच्यासह पोलिस अधिकारी बहुसंख्येने यावेळी उपस्थित होते.
याप्रसंगी आमदार चाबुकस्वार व पोलिस आयुक्तांचा मस्जिदच्या पदाधिकाऱ्यांनी सन्मान केला. यावेळी आयुक्त पद्मनाभन यांनी, लोकप्रतिनिधी व प्रशासन यांना या पार्टीमध्ये बोलावून संवाद, विकास व समतेचे चांगले कार्य मस्जिदच्या पदाधिका-यांनी केल्याचे म्हटले. शेकडो प्रकारचे खजूर, सुकामेवा यावेळी पाहुण्यांच्या सरबराईसाठी ठेवण्यात आला होता. त्याचा सर्वांनी स्वाद घेतला.