रक्तदानासाठी उद्योजकांचा पुढाकार
![Entrepreneurial initiative for blood donation](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/रक्त-1.jpg)
आकुर्डीत रक्तदान शिबिरात १२५ रक्तपिशव्यानचे संकलन
पिंपरी |प्रतिनिधी
आकुर्डी इंडस्ट्रीयल इस्टेट संस्थेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. आकुर्डी इंडस्ट्रीयल इस्टेट येथील डी १ ब्लॉक येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात उद्योजक, कामगार यांनी सहभाग घेत रक्तदान केले. या वेळी १२५ रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले.
देशासह राज्यात रक्ताचा पुरवठा अपुरा पडत आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी देखील या बाबत खंत व्यक्त केली होती. त्यासाठी नागरिकांनी रक्तदान शिबीर आयोजित करण्यावर भर द्यावा, असे त्यांनी आवाहन केले होते. या आवाहनाला पिंपरी चिंचवड शहरातील उद्योजकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. उद्योजकांनी पुढाकार घेत रक्तदान शिबिराचे आयोजन केले. आकुर्डी इंडस्ट्रीयल इस्टेट येथे नुकतेच हे शिबीर पार पडले. या शिबिरात उद्योजक, कामगार सहभागी झाले होते. या शोबोरातून १२५ रक्त पिशव्या संकलित करण्यात आल्या. रुबी अलकेअर या ब्लड बँकेकडे रक्त पिशव्या सोपविण्यात आल्या.
गिरीश वैद्य, हुकुमचंद वायडोळे, श्रीराम रानडे, मोदी, आदीसह आकुर्डी इंडस्ट्रीयल इस्टेट संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी पिंपरी चिंचवड लघुद्योजक संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी शिबिराला भेट दिली.