Breaking-newsपिंपरी / चिंचवड
योगेश पगडे खून प्रकरणी आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ
![Thirteen people have been remanded in police custody for three days in connection with the ransom case](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/arrest-LOCKER-2.jpg)
वडगाव मावळ – व्यावसायिक योगेश पगडे यांच्या खून प्रकरणातील आरोपीं मयूर रामदास सुतार, किशोर उर्फ बंटी शिवाजी वायकर, अक्षय उर्फ पप्पू मतेश कुडे व दत्तात्रय गोपीनाथ केदारी यांच्या पोलीस कोठडीत मावळ न्यायालयाने सोमवार दि. 21 पर्यंत वाढ केली आहे. त्यांनी रविवार दि. 13 ला खून केला होता.
सर्व आरोपींना शुक्रवार दि. 18 पर्यंत पोलीस कोठडी दिली होती. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने पुन्हा मावळ न्यायालयात हजर केले. अधिक तपास करण्यासाठी आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याचे आदेश न्यायाधीशांनी दिले. सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश लोकरे तपास करीत आहेत.