breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

येत्या सोमवारी जागतिक दिव्यांग दिनानिमित्त पात्र दिव्यांगांना पेन्शन वाटप

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिका नागरवस्ती विकास योजना विभागातर्फे अपंग कल्याणकारी योजना राबविण्यात येते. यामध्ये महानगरपालिका हद्दीत राहणा-या दिव्यांग व्यक्तींसाठी अर्थसहाय्य (पेन्शन) योजना प्रथमच सुरू करणेत आलेली आहे, त्या पेन्शन योजनेचे वाटप सोमवारी (दि. ३) चिंचवड येथील प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे सकाळी दहा ते दुपारी तीन या वेळेत होणार आहे. अशी माहिती महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, महिला व बालकल्याण समिती सभापती स्विनल म्हेत्रे यांनी दिली.

दरम्यान, या वेळी दिव्यांगांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम, उल्लेखनिय कार्य करणा-या दिव्यांग व्यक्तींचा सत्कार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात येणार आहेत. तसेच पंडीत दिनदयाल उपाध्याय दिव्यांग कल्याणकारी (अर्थसहाय्य) योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्य (पेन्शन) लाभ वितरित करणेत येणार आहे. संत गाडगे महाराज – दिव्यांग व अव्यंग जोडप्यांना विवाहासाठी प्रोत्साहनपर अर्थसहाय्य या नवीन योजनेचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

समाजातील अनेक दिव्यांगांच्या अडचणी दूर करण्यासाठी शासन अनेक योजना राबवित आहे. या योजनांचा दिव्यांगांनी लाभ घ्यावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमास पिंपरी चिंचवड परिसरातील सर्व दिव्यांगांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार आणि महिला व बालकल्याण समिती सभापती स्विनल म्हेत्रे यांनी केले आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button