मुख्यमंत्र्यांना आश्वासनांची आठवन करून देण्यासाठी महापालिकेसमोर घंटानाद’
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/478.jpg)
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – शास्तीच्या कराच्या प्रश्नासाठी मुख्यमंत्र्यांनी दिलेला पंधरा दिवसांचा अल्टिमेटम संपल्याने राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, मनसे तसेच विविध सामाजिक संस्था, संघटनांच्या वतीने पिंपरी-चिंचवड महापालिका भवनासमोर आज घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी सत्ताधारी भाजप सरकारचा शंख वाजवून निषेध करण्यात आला.
पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामांचा शंभर टक्के शास्तीकर माफ करावा. अशी शहरवासियांची मागणी असताना शहरातील भाजपच्या दोन्ही आमदारांनी मुख्यमंत्र्यांना हा प्रश्न जटील बनला असून तो सोडविण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे, अशी जाणिव करून दिली होती. त्यावर चिंचवड येथील एका जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या पंधरा दिवसांत शास्ती कराचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते. हे पंधरा दिवस 24 जानेवारी रोजी संपले. तरी, आजतागायत शास्ती कराच्या प्रश्नावर मंत्रीमंडळात साधी चर्चा झाली नाही. याच्या निषेधार्त विरोधकांनी एकत्र येऊन आज भाजप सरकारचा शंख वाजवून घंटानाद आंदोलन करत निषेध केला.
आंदोलनात विरोधी पक्षनेते दत्ता साने, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसे गटनेते सचिन चिखले, नगरसेवक अमित गावडे, राजू मिसाळ, पंकज भालेकर, स्वराज अभियानचे मानव कांबळे, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, माजी महापौर कवीचंद भाट, नगरसेविका संगीता ताम्हाणे, पौर्णिमा सोनवणे, माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर, भारिप बहुजन महासंघाचे गुलाब पानपाटील, काँग्रेसचे संग्राम तावडे, संदीपान झोंबडे, मराठा सेवा संघाचे प्रकाश जाधव, शेकापचे हरिष मोरे, शिवशाही व्यापारी सेनेचे युवराज दाखले, गणेश आहेर, संभाजी ब्रिगेडचे सतीश काळे, सुभाष साळुंके, प्रल्हाद कांबळे यांच्यासह नागरिक सहभागी झाले आहेत.
भाजप सरकारला दिलेल्या आश्वासनांची आठवण करुन देण्यासाठी महापालिकेसमोर हे आंदोलन करण्यात आले. शास्तीकर माफ झालाच पाहिजे’, ‘भाजप सरकारचे करायचे काय, खाली डोके वर पाय’ अशा घोषणा आंदोलकांनी दिल्या.