breaking-newsपिंपरी / चिंचवड

माजी नगरसेवक साहेबराव खरात यांचे निधन

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

कोरोना संसर्गामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक साहेबराव खरात (वय ६७) यांचे मंगळवारी मध्यरात्री निधन झाले. सर्दी खोकल्याचा त्रास होत असल्याने बुधवारी त्यांनी (ता. २) महापालिकेच्या रुग्णालयात कोरोना टेस्ट केली. ती टेस्ट गुरुवारी(ता. ३) पॅाझीटिव्ह आली. 

त्यांना महापालिकेच्या रुग्णालयात गुरुवारी ऑक्सिजन बेड उपलब्ध न झाल्यामुळे ते शुक्रवारी भोसरी कोविड रुग्णालयात बेड उपलब्ध झाल्यावर दाखल झाले. त्याठिकाणी उपचार सुरु होते. महापालिकेच्या २००२ मध्ये झालेल्या निवडणुकीत आमदार विलास लांडे यांच्या अपक्ष पॅनलमधून ते निवडून आले होते. सामाजिक कार्याच्या माध्यमातून त्याचा जनसंपर्क खूप मोठा होता. त्यांनी बुद्धिस्ट चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अग्रीकल्चर पथसंस्थेची स्थापना केली. त्यांनी शाहूनगरमधील धम्मचक्र बुध्दविहारच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहरात धम्माचा प्रसार केला होता. ते उत्तम व्याख्याते होते. 

रहाटणीत त्यांनी जावई अरुण चाबुकस्वार, संदीप चाबुकस्वार यांच्या समवेत क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एजुकेशन फाउंडेशन संचलित न्यू सिटी प्राईड मिडीयम स्कूल सुरु केली. त्यांच्या काम करण्याच्या शैलीमुळे ‘घरा घरात खरात’ अशी चळवळ प्रचिलित झाली होती. धडाडीचे कार्यकर्ते, शोषित, वंचित, बहूजनांचा आवाज, माजी नगरसेवक खरात यांच्या जाण्याने सामाजिक चळवळीची मोठी हाणी झाली आहे. त्यांना अरुण चाबुकस्वार यांच्या परिवारातर्फे भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button