breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महिलेला ‘चल चल..’ म्हणणे पडले महागात, दोन सख्ख्या भावांसह चौघांची रवानगी ठाण्यात

पिंपरी / महाईन्यूज

बाथरूमला जात असलेल्या महिलेला आश्लिल हावभाव करत चल चल.. म्हणणे दोन सख्ख्या भावांना चांगलेच महागात पडले आहे. महिलेने पोलिसांत तक्रार देताच दोन्ही भावांसह त्यांच्या पत्नींना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा प्रकार 25 ऑक्टोबर 2020 रोजी एमबी कॅम्प देहूरोड येथे घडला.

अमित आझाद बहोत, अजित आझाद बहोत, आरती अमित बहोत, मयुरी अजित बहोत (सर्व रा. एमबी कॅम्प, दोहूरोड) यांना अटक केली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने देहूरोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला बाथरुमला जात होत्या. त्यावेळी अमित आणि अजित दोघांनी तिला अडवून चल चल… म्हणत आश्लिल हावभाव केले. त्यानंतर दोघांच्या पत्नी आरती आणि मयुरी या दोघींनी पीडितेला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. याप्रकरणी चौघांना अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक कुदळे यांनी सांगितली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button