breaking-newsTOP Newsपिंपरी / चिंचवड

महाविकास आघाडीकडून भोसरीतील ‘या’ तिघांना महामंडळावर संधी?

भाजपाला रोखण्यासाठी महाविकास आघाडीचा ‘मास्टरप्लॅन’

महाविकास आघाडीच्या नेत्यांचे महामंडळ वाटप अंतिम टप्प्यात

पिंपरी । विशेष प्रतिनिधी

राज्यातील महाविकास आघाडीकडून सर्वच महामंडळांच्या जागांचे वाटप करण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका आगामी निवडणुकीत सत्ताधारी भाजपाला रोखण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ‘मास्टरप्लॅन’ केला असून, महामंडळाच्या माध्यमातून स्थानिक नेत्यांना ताकद देण्यात येणार आहे.

महामंडळ जागावाटपाबाबत मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात महाविकास आघाडीच्या निवडक नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. ‘ज्या विभागाचे मंत्रिपद नाही त्या पक्षाला महामंडळाचं अध्यक्षपद’ या धोरणानुसार महामंडळ च वाटप होईल. यानुसार सिडको- काँग्रेस, म्हाडा- शिवसेना तर महिला आयोग- राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती विश्वासनीय सूत्रांनी दिली.

सध्या महापालिकेतील सत्ताधारी भाजपाचा शहराध्यक्षपदाची धुरा भोसरी विधानसभेत म्हणजेच आमदार महेश लांडगे यांच्याकडे आहे. महेश लांडगे यांच्या नेतृत्त्वाखाली निवडणूक लढवली जाणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते लांडगेच्या ‘होमपीच’ वर अधिकाधिक चेहऱ्यांना संधी देवून भाजपाला आव्हान देण्याचा प्रयत्न करणार आहे.

त्यामुळे आमदार महेश लांडगे यांचे कट्टरप्रतिस्पर्धी असलेले माजी आमदार विलास लांडे, शिवसेनेचे कामगार नेते इरफान सय्यद आणि शिवसेना संघटिका सुलभा उबाळे यादोघांपैकी एकाला महामंडळावर संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.

माजी आमदार विलास लांडे यांना प्राधिकरण अध्यक्षपद?

पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसकडे  सध्यस्थितीला माजी आमदार विलास लांडे एकमेव स्थानिक तगडे नेतृत्व आहे. लोकसभा निवडणुकीत संपूर्ण तयारी केलेली असताना पक्षश्रेष्ठींनी ऐनवेळी विलास लांडे यांचे शिरुरमधून तिकीट कापले होते. तसेच, विधानसभा निवडणुकीत स्व. दत्ता साने की लांडे या वादात भोसरीतून अपक्ष निवडणूक लढवण्याची कसरत करावी लागली होती. आता महापालिका निवडणुकांत राष्ट्रवादीला पर्यायायाने महाविकास आघाडीला स्थानिक प्रभावी चेहऱ्याला संधी देणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे विलास लांडे यांना पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी संधी देण्यात येईल. विशेष म्हणजे, प्राधिकरण अध्यक्षपद हे राज्यमंत्री दर्जाचे पद आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button