breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेची पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारिणी जाहीर
पिंपरी, (महाईन्यूज) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची चित्रपट शहर कार्यकारिणी जाहिर झाली असून संघटक पदी प्रज्ञा पाटील, दत्ता घुले यांच्यासह अन्य पदाधिका-यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी पत्रकार परिषदेत सांगितली.
उपसंघटक पदी तुकाराम शिंदे, दीपक भालेराव, प्रसाद खैरे, सचिव शिवनाथ दिलपाक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चित्रपट क्षेत्रात अभिनेत्यापासून ते निर्मात्यापर्यंत जाणावणा-या समस्यांना वाचा फोडण्यासाठी ही संघटना काम करणार आहे. अनेक कलाकार पिंपरी-चिंचवड शहरात आहेत. त्यांच्या कलेला दाद मिळत नाही. त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा कोणी प्रयत्न करत नाही. त्यामुळे चित्रपट क्षेत्रातील सर्वांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवून त्याचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे, अशी माहिती चिखले यांनी दिली.