महापौर चषक स्पर्धेतील विजयी खेळाडुंचे शिवसेनेकडून अभिनंदन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/IMG-20200218-WA0015.jpg)
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
फ्रेंड्स बॉक्सिंग क्लब फुगेवाडीच्या खेळाडूंनी महापौर चषक स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याबद्दल शिवसेना ज़िल्हासंघटिका सुलभा उबाळे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
फ्रेंड्स क्लब बॉक्सिंगचे प्रशिक्षक राहुल धोत्रे व अविनाश बहारे या दोघांनी निशुल्क विद्यार्थींना मोफत शिक्षण देऊन समाजापुढे आदर्श ठेवला आहे. तसेच यापुढेही खेळाडूंच्या मदतीसाठी शिवसेना सदैव मदत करेल, असे प्रतिपादन उबाळे यांनी केले.
ह्यावेळी उपविभागप्रमुख एकनाथ हाके, नंदू काची, संजय गरुड, अजित बोराडे, बाबू बापूर, कैलास लांडे, शिवराय डिग्गीकर, सुनील साठे, अविनाश जाधव, यासिन सारवाण, सुभाष डिग्गीकर, राहुल धोत्रे, चिंचपा निंगडोळे, राजू खलसे, विकास गायकवाड, अविनाश बहारे, युवती सेनेच्या दीपा जगदाळे, प्रेमा गायकवाड, उज्वला भालेराव, युवासेनेचे विभागसंघटक निलेश हाके उपस्थित होते.