breaking-newsTOP Newsपिंपरी / चिंचवड

महापौर कुठे गायब ?, शहराच्या समस्या महत्वाच्या की ‘इगो’

  • कोविडकाळात सत्ताधारी भाजपकडून श्रेयवादाचा प्रयत्न
  • राष्ट्रवादी-भाजपच्या राजकारणात बाधीत नागरिकांचे हाल

पिंपरी महाईन्यूज प्रतिनिधी

कोरोना विषाणुने पुण्यासह पिंपरी-चिंचवड शहराला अक्षरषः विळखा घातला आहे. हजारहून अधिक रुग्णांची दररोज नोंद होत आहे. त्यांना उपचार देण्यासाठी नेहरूनगर येथील एक हजार बेडच्या कोविड सेंटरची उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी काल पाहणी केली. या भेटीत सत्ताधारी भाजपचे उपमहापौर, पक्षनेते आदी पदाधिकारी सहभागी होते. मात्र, शहराच्या प्रथम नागरिक असणा-या महापौर उषा उर्फ माई ढोरे उपस्थित न राहिल्यामुळे शहरात वेगळा संदेश गेला आहे. अजित पवार यांच्या दौ-याबाबत महापौरांना कळवले गेले नाही, कि त्यांना जाणीवपूर्वक उपस्थित राहू दिले गेले नाही, यावरून राजकीय क्षेत्रात चर्चेचा खल सुरू आहे.

संपूर्ण उद्योगनगरीला कोविड 19 विषाणुची बाधा होत आहे. वाढती रुग्णसंख्या पाहता आजघडीला पिंपरी-चिंचवडच्या एकाही रुग्णालयात बेड्स उपलब्ध नाहीत. पिंपरी-चिंचवडच्या नागरिकांचा कोविडपासून बचाव करण्यासाठी अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये एकूण तीन मोठी कोविड सेंटर उभारण्याचे आदेश दिले होते. त्यातील नेहरूनगर येथे उभारण्यात येत असलेल्या एक हजार बेडच्या कोविड सेंटरची त्यांनी काल शुक्रवारी (दि. 7) पाहणी केली. त्यांच्या दौ-यात भाजपचे पक्षनेते नामदेव ढाके, उपमहापौर तुषार हिंगे सहभागी होते. मात्र, महापौर ढोरे यांची अनुपस्थिती बोलकी ठरली. कोरोनाबाधीत रुग्णांना या जीवघेण्या संकटातून बाहेर काढण्यासाठी त्या प्रयत्नवादी आहेत, की त्यांना राजकीय हेतू साध्य करावयाचा आहे, असा सवाल त्यांच्या भूमिकेवर निर्माण होत आहे.

महापौरांच्या अनुपस्थितीमागे जगतापांची खेळी !

कोविड 19 संदर्भात पुणे महापालिकेच्या कामकाजाची देखील अजित पवार यांनी पाहणी केली. त्यांच्यासोबत पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ प्रत्यक्ष उपस्थित होते. भाजपच्या अन्य पदाधिका-यांनी देखील पवार यांच्याशी संवाद साधला. कोणत्याही परिस्थितीत नागरिकांना कोरोनाच्या संकटातून बाहेर काढण्याचा आशावाद त्यांनी पवार यांच्यासमोर बोलून दाखविला. मात्र, हेच पिंपरी-चिंचवडमध्ये उलटे घडल्याने भाजपतील अंतर्गत राजकारणाचे दर्शन घडले. नागरिकांचा जीव वाचविण्यासाठी पालकमंत्री या नात्याने पवार यांच्याशी महापौरांनी संवाद साधणे अपेक्षीत होते. मात्र, त्या उपस्थित राहिल्या नाहीत. ही दुर्दैवी बाब आहे.

मुळात महापौर ढोरे या आमदार लक्ष्मण जगताप गटाच्या मानल्या जातात. लक्ष्मण जगताप आणि अजित पवार यांचे राजकीय वैर आहे. कोविड सेंटरमध्ये श्रेयवाद निर्माण करण्यासाठी, महापौरांनी पवार यांच्या दौ-यात सहभागी होऊ नये, असे जगतापांनीच महापौरांना सांगितले होते की काय, असा संशय निर्माण होत आहे. यापूर्वीही पवार शहरात आले तेव्हा महापौर उपस्थित राहिल्या नव्हत्या. त्यामुळे यामागे श्रेयवादाचे राजकारण असल्याचा ठपका भाजपवर ठेवला जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button