महापाैर राहूल जाधवांचे नाव सांगून पिंपरीत तळीरामाचा धिंगाणा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/1-1-3.jpg)
पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापाैर राहूल जाधव यांचे नाव सांगून एका तळीरामाने भर चाैकात पोलिसांना आरेरावी करुन गोंधळ घातला. तब्बल पाऊण तास हा गोंधळ सुरु होता. त्याने महापाैरांना फोन लावून पोलिसांना बोलण्यास दिला. मात्र, पोलिस अधिका-यांने फोन घेणे टाळले. सदरील तळीरामाला पोलिस ठाण्यात नेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
काल शुक्रवारी सायंकाळी एका तळीरामाने पुणे-मुंबई महामार्गावर पिंपरी पोलिस ठाण्यासमोर नो-पार्किंगमध्ये दुचाकी पार्क केली होती. चिंचवड वाहतूक शाखेचे निरीक्षक संजीवकुमार पाटील यांच्या आदेशानुसार त्याच्या दुचाकीला जॅमर लावला. तळीरामाने दुचाकीला जॅमर लावल्याचे पाहताच गोंधळ घालण्यास सुरुवात केली. ‘मी महापौरांचा कार्यकर्ता आहे’ असे सांगून त्याने पोलिसांना अरेरावी करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी त्याला समजावत दंडाची रक्कम भरण्यास सांगितले, मात्र, त्याने थेट महापौरांनाच फोन लावून पाटील यांना बोलण्यास सांगितले. मात्र, पाटील यांनी महापौरांचा फोन घेणे टाळले. सुरवातीला तो दंड भरण्यास तयार नव्हता. मात्र नंतर त्याने रोख स्वरूपात पैसे भरण्याचा आग्रह करीत गोंधळ घातला. गर्दी वाढू लागल्याने पाटील यांनी नियंत्रण कक्षाकडे मदत मागितली.
दरम्यान, महापालिकेच्या महापाैर कक्षात महापाैरांच्या अनेक कार्यकर्तांचा राबता असतो. अनेक कार्यकर्ते सकाळपासून सायंकाळपर्यंत ठाण मांडून बसलेले असतात. महापालिकेच्या कित्येक अधिका-यांना महापाैरांचा कार्यकर्त्यांना असल्याचे सांगून कामेही करुन घेतात. याबाबत काही अधिकारी त्रस्त झाले असून ते उघडपणे बोलण्यास नकार देत आहेत. त्यामुळे महापाैरांच्या कार्यकर्त्यांमुळे पालिका अधिकारी व पोलिस कर्मचारी त्रस्त असल्याचे दिसून येत आहे.