महापालिकेत शहर परिवर्तन कार्यालयाची स्थापना
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/pcmc_2017082655-3.jpg)
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांच्या जीवनमानाचा दर्जा सुधारण्यासाठी स्वच्छ, शाश्वत, पर्यावरणपुरक तसेच जागतिक दर्जाचे शहर म्हणून विकास करावयाचा आहे. यामुळे नागरिकांना दर्जेदार जीवनासह शहराच्या विकास करता यावा, याकरिता महापालिकेने पॅलेडियम या सल्लागार संस्थेची नेमणुक करुन शहर परिवर्तन कार्यालयाची स्थापना (CTO) करण्यात आली आहे.
शहर परिवर्तन कार्यालयाद्वारे पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत एक नागरिक प्रतिबध्दता सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणामार्फत प्रश्नावली तयार करण्यात आली आहे. या प्रश्नावलीचे उत्तर देऊन त्याचे धोरण देखील बनविण्यात येणार आहे. नागरिकांना या सर्वेक्षणात भाग घेतल्यावर शहराची सुधारणा करण्यास मदत होणार आहे. नागरिकांच्या सहभागाच्या उत्तरातुन एक नविन आराखडा तयार करणेत येणार आहे. त्या धोरणानुसार आराखडा तयार करताना नागरिकांकडुन मिळालेली आवश्यक माहिती, मत व विधानांचा यामध्ये समावेश असणार आहे.
नागरिकांना प्रश्नावली भरण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागणार असुन सर्वेक्षण पुर्ण करणे हे महत्वाचे आहे. सदरील उत्तरे ही उद्दिष्टे तयार करणेच्या उद्देशाने आहेत, नागरिकांनी प्रश्नावलीमध्ये पोहोचण्यासाठी QR कोड स्कॅन करुन, ती पुर्ण करुन ऑनलाईन जमा करावी. सर्वासाठी याबाबतची लिंक http://tinyurl.com/yatd9weo महानगरपालिकेच्या वेबसाईट वर उपलब्ध आहे. हि प्रश्नावली जास्तीत जास्त नागरिकांनी भरावी आणि शहराचे धोरण तयार करण्यास जास्तीत जास्त नागरिकांनी भाग घ्यावा, असे आवाहन प्रभारी अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांनी केले आहे.