Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

महापालिकेतील अभिलेख ठेवण्यासाठी 12 कोटी रुपयाची मशीन खरेदीचा विषय रद्द

  • भांडार विभागाकडून मशीन खरेदीचा प्रस्ताव रद्द करण्याचा शिफारस
  • आयुक्तांच्या टेबलावरील ठेवला प्रस्ताव 

पिंपरी ( महा ई न्यूज ) –  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विभागामध्ये केवळ फाईल ठेवण्यासाठी बारा कोटींचे अद्ययावत “ऍडव्हान्स डॉक्‍युमेंट मॅनेजमेंट सिस्टिम’ मशिन खरेदी करण्यात येणार होते. याविषयी भांडार विभागाकडून मशीन खरेदीचा घाट घातला होता. मात्र, महापालिकेच्याच अग्नीशमन विभागाने सीएसआरच्या माध्यमातून सुसज्ज अभिलेख कक्ष तयार केला. त्यावर पाच ते सात लाखापर्यंत खर्च झाला आहे. तसेच भांडार विभागाने दोन वर्षापुर्वीच नवे कोरे फर्निचर बनविले होते. आता नव्याने मशीन खरेदीवर कोट्यावधीचा खर्च करण्यास सुरुवात केल्याने टीकेची झोड उमटली होती. त्यामुळे भांडार विभागाकडून सदरील मशीन खरेदीचा प्रस्ताव रद्द करण्याची शिफारस आयुक्त श्रावण हर्डिकर यांच्याकडे ठेवला असून त्यावर आयुक्त काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे. 

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या भांडार विभागाकडे या मशिनसाठी चार निविदा आल्या होत्या. एकाच व्यक्तीने तीन वेगवेगळ्या नावाने निविदा भरली होती. महापालिकेतील प्रत्येक विभागाच्या अभिलेख कक्षासाठी तसेच आठ क्षेत्रीय कार्यालयांमधील बांधकाम, आरोग्य, विद्युत, माहिती व जनसंपर्क, पर्यावरण, वैद्यकीय, अतिक्रमण, उद्यान, पाणीपुरवठा, लेखा विभाग अशा विविध विभागांसाठी 50 मशिन खरेदी करण्यात येणार आहे. एक मशिन सुमारे 24 ते 25 लाखांना खरेदी करण्यात येत आहे. महापालिकेत शुक्रवारी मशिन दाखविण्यासाठी आणले होते. हे मशिन संगणकाच्या साह्याने वापरले जाणार होते.

या मशिन खरेदीसाठी अर्थसंकल्पात तरतूद नाही. त्यासाठी अर्थसंकल्पात हेडही नाही. त्यामुळे या खरेदीसाठी निधी कोठून उपलब्ध करण्यात अडचण येवू लागली होती. प्रत्येक विभागाचे गेल्या वर्षी नूतनीकरण करून नवे कोरे फर्निचर केले आहे. त्या फर्निचरचे काय करायचे, हाही प्रश्‍न निर्माण झाला होता.  कर्मचारी किंबहुना अधिकारी एखादी फाइल शोधू शकतात. जी कामे कर्मचारी करू शकतात, त्या कामासाठी कोट्यवधी रुपये खर्चून मशिनची गरजच काय?, असे प्रश्‍न उपस्थित झाले होते.

दरम्यान, महानगरपालिकेच्या भांडार विभागाकडून विविध विभागातील अभिलेख ठेवण्यासाठी तब्बल 12 कोटीची मशिनरी खरेदी करण्यात येणार होती. परतू, मागील दोन वर्षापुर्वीच लाखो रुपये खर्च करुन रॅंक तयार केले होते. त्याचा खर्च वायाच जाणार होता. शिवाय मशीन खरेदी एका ठेकेदारांला डोळ्यासमोर ठेवून करण्यात येत होते. त्यामुळे नवीन मशीन खरेदीवर अनेकांनी टिका करुन सदरील प्रस्ताव रद्द करण्याची मागणी केली होती.

 

महापालिकेतील अभिलेख अस्ता-व्यस्त पडलेले असतात. तसेच काही रॅंकवर व्यवस्थित ठेवता येत नव्हते. त्यामुळे या मशिनमध्ये मेकॅनाइज ऑटोमॅटिकही डॉक्‍युमेंट स्टोअरेजसाठी जागा आहे. मशिनद्वारेच त्यावर नियंत्रण ठेवले जाणार होते. याकरिता अभिलेख विभागाने या मशिनची गरज असल्याचे भांडार विभागाला कळविले होते. त्यामुळे 50 मशिन मागविल्या आहेत. त्याला सॉफ्टवेअरचा खर्च येत नाही. मात्र, हार्डवेअरचा खर्च येऊ शकतो. महापालिका भवनाच्या तळ मजल्यावर मशिनसाठी जागा उपलब्ध केली होती. परंतू, काही तांत्रिक कारणास्तव हा प्रस्ताव आयुक्तांकडे पाठविला असून मशीन खरेदीचा विषय रद्द करण्यात येणार आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली. 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button