breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिकेच्या विषय समित्यांची मुदत 7 मे संपुष्टात

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विषय समित्यांची मुदत येत्या 7 मे 2019 रोजी संपृष्टात येत आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरु असतानाच या समित्या बरखास्त होणार आहे. त्यामुळे सद्यस्थितीत पदावर असणा-या पदाधिका-यांना कोणताच कारभार न करता पायउतार व्हावे लागणार आहे.

पिपंरी-चिंचवड महापालिकेच्या विधी समिती, महिला व बाल कल्याण समिती, शहर सुधारणा समिती, क्रीडा, साहित्य, सांस्कृतिक समिती आणि नवीन शिक्षण समिती अशा पाच विषय समित्या आहेत. त्यापैकी शिक्षण समिती विलंबाने गठीत झालेली आहे. परंतु, इतर चार विषय समित्यांचा दुस-या वर्षाचा कालावधी येत्या 7 एप्रिल रोजी संपृष्टात येत आहे. मात्र,  लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता 10 मार्चपासून लागू झाल्यानंतर समित्यांचे कामकाज ठप्प आहे.

त्यात या समितीचा कार्यकाल नेमका आचारसंहितेत संपत आहे. समित्या आचारसंहितेत बरखास्त झाल्यामुळे सदस्थितीत समित्यांच्या सभापती व सदस्यांना या पदाचा कोणताही फायदा होणार आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल 23 मे 2019 रोजी लागणार असून त्यानंतरच आचारसंहिता शिथिल होईल. आचारसंहिता शिथिल झाल्यानंतर विषय समित्यांसाठी नवीन पदाधिका-यांची नेमणूक केली जाणार आहे.

मे महिन्यात सदस्य निवडीचा प्रस्ताव
आचारसंहिता असताना समित्या बरखास्त होत आहे. त्यामुळे येत्या 20 मे रोजी होणा-या महापालिका सर्वसाधारण सभेसमोर विषय समिती सदस्य निवडीचा प्रस्ताव ठेवण्यात येईल. सभेत सदस्य निवड करता येईल. मात्र, आचारसंहितेमुळे सभा तहकूब केल्यास सदस्य निवड आणखी एक महिना लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button