Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीपिंपरी / चिंचवड
महापालिकेच्या ‘कोविड 19 वॉर रूम’मध्येच कोरोनाचा शिरकाव
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/pcmc-scaled.jpg)
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
कोरोनाबाधीत नागरिकांची दैनंदीन माहिती अपडेट ठेवण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने तयार केलेल्या कोविड 19 वॉर रुममध्येच कोरोनाने शिरकाव केला आहे. वॉररुममधील एका डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याने पालिकेत खळबळ उडाली आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचा कहर सुरू आहे. दिवसाला ५०० हून अधिक बाधित रूग्ण आढळत आहेत. शहरातील आमदार, नगरसेवक, पालिकेतील अधिकारी कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. पालिकेच्या अनेक कर्मचाऱ्यांना देखील कोरोनाची लागण होत आहे. आतातर कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी उभारण्यात आलेल्या वॉररूमध्येच कोरोनाने शिरकाव केला आहे.
वॉररूम मधील एका डॉक्टरला कोरोनाची लागण झाली असून इतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी केली जाणार आहे. संपूर्ण वॉररूम सॅनिटाईज केली जाईल अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.