महापालिकेच्या कार्यक्षेत्रात कचरा टाकणा-यावर फाैजदारी करणार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/08/pcmc-building-696x368.jpg)
पिंपरी |महाईन्यूज|
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीलगतच्या गावांमधून शहराच्या हद्दीत घनकचरा आणि हॉटेलमधील टाकाऊ पदार्थ टाकत येत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याला आळा घालण्याकरिता महापालिकेमार्फत फिरती पथक तैनात करण्यात आली असून, पालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक आणि फौजदारी कारवाई करण्याचा इशारा आरोग्य विभागाने दिला आहे.
महापालिकेच्या हद्दीलगत असलेल्या गावांमधून त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये उत्पन्न होणारा घनकचरा, हॉटेल वेस्ट महापालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये टाकण्यात येत आहेत. या प्रकाराला आळा घालण्यासाठी महापालिकेमार्फत फिरती पथके तैनात करण्यात आली आहेत. या पथकामार्फत महापालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये बाहेरुन येणारा कचरा टाकणाऱ्या व्यावसायिक व नागरिकांवर दंडात्मक, फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.
त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाईदेखील प्रस्तावित करण्यात येणार आहे. त्यामुळे शहराच्या कार्यक्षेत्रामध्ये बाहेरुन येणारा कचरा टाकल्याने आढळून आल्यास नागरिकांनी छायाचित्रासहित माहिती महापालिकेला द्यावी. कचरा टाकण्याऱ्याचे छायाचित्र ९९२२५०१८७२ क्रमांकावर व्हॉटस् अॅपच्या माध्यमातून पाठविण्याचे आवाहन आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांनी केले आहे.