Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
महापालिकेची स्थायी सभा तहकुब ; पंतप्रधान आवास योजनेंचा विषय लांबणीवर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/pmc-logo.png)
पिंपरी – महापालिका स्थायी समितीची साप्ताहिक आज (बुधवार) सभा तहकूब करण्यात आली. धुळे येथे हत्या झालेल्या पाच जणांना श्रद्धांजली वाहून ही सभा पुढील बुधवार (दि.11) पर्यंत तहकूब करण्यात आली.
पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समिती आज (बुधवारी) सभेचे आयोजन केले होते. या सभेच्या अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या. स्थायी समितीच्या विषय पत्रिकेवर पंतप्रधान आवास योजनेंसह विविध विषय मंजूरीसाठी ठेवले होते. परंतू, धुळ्यासह दिल्लीतील एकाच कुटूंबातील अकरा जणांचा मृत्यू झाल्याने त्या नागरिकांना श्रद्धांजली वाहून स्थायी समितीची सभा पुढील बुधवारपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.