breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिका शिक्षण विभागात होणार ‘गुरुजीं’च्या बदल्या

  • 130 शिक्षकांचे बदलीसाठी अर्ज दाखल

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागात शिक्षक बदल्यांची प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. मात्र, शिक्षक बदल्यांमुळे होणारे वाद टाळण्यात येणार आहेत. प्रशासनाने यंदा बदल्या करताना, 5 टक्के प्रशासकीय, 5 टक्के विनंती व मेडीकल अर्जावर शिक्षकांच्या बदल्या करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या सर्व शाळा 17 जूनपासून सुरू होत असून प्रत्येकी 10 टक्‍के शिक्षकांच्या बदल्या करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांनी दिली.

पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रामध्ये उत्तम दर्जाच्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध आहेत. त्यामध्ये शिशुगट ते पदवित्तर शिक्षण उपलब्ध आहे. महापालिकेमार्फत १३६ प्राथमिक व १८ माध्यमिक शाळा मार्फत शैक्षणिक सुविधा उपलब्ध आहेत. या शाळांमधील शिक्षकांची संख्या एकूण 1 हजार 72 इतकी आहे.

महापालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे या शिक्षकांच्या दर तीन ते सहा वर्षांनी बदल्या होणे अपेक्षित आहे. मात्र, गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून काही शिक्षकांच्या बदल्या झालेल्या नाहीत. त्यातच अनेक शिक्षक, शिपाई आणि रखवालदार वर्षानुवर्षे एकाच शाळेत ठाण मांडून आहेत. त्यामुळे यावर्षीच्या शैक्षणिक वर्षात या सर्व कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचे प्रशासनाने निश्‍चित केले आहे.

या बदल्यांमध्ये अनेक शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांच्या घराजवळच्या शाळेतच काम करीत आहेत. तेथील नगरसेवकांच्या सांगण्यावरुन काही शिक्षक व इतर कर्मचा-यांना घर जवळील शाळांमध्ये अध्यापनाचे काम करीत आहेत. त्या शिक्षक व कर्मचा-यांना बदल्या करण्याचा विचार प्रशासन विभागाने घेतला आहे. त्यामुळे या बदल्या वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे.

दरम्यान, महापालिका शिक्षण विभागातील शाळांमध्ये एकूण 1072 शिक्षक कार्यरत आहेत. 31 मार्च 2019 पर्यंत बदलीसाठी शिक्षकांचे अर्ज मागविण्यात आले होते. त्यात 130 जणांचे अर्ज प्राप्त झालेले आहेत. त्या सर्व अर्जाचे शासन नियमावली तपासून आणि त्यांची सेवा ज्येष्ठता बघून बदली करण्यात येणार आहे. 15 जूनपर्यंत सर्व शिक्षकांच्या अर्जाचा विचार करुन बदली करण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button