ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
PCMC : महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांना पालिकेतर्फे अभिवादन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/DSC_6656-copy.jpg)
पिंपरी (महा ई न्यूज) – महापालिकेच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस महापौर राहुल जाधव यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
महापालिकेच्या मुख्य प्रशासकिय इमारतीत झालेल्या या अभिवादन कार्यक्रमास स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, शहर सुधारणा समिती सभापती सीमा चौगुले, अ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे, शिक्षण समिती उपसभापती शर्मिला बाबर, सामाजिक कार्यकर्त्या आदिती निकम, सहाय्यक आयुक्त मंगेश चितळे, आशादेवी दुरगुडे, अण्णा बोदडे आदी उपस्थित होते.
सुत्रसंचालन माहिती व जनसंपर्क विभागाचे रमेश भोसले यांनी केले.