”महाईन्यूज”च्या पिंपरी-चिंचवड कार्यालयात पर्यावरणपूरक गणपतीची प्रतिष्ठापना
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/IMG-20200822-WA0016.jpg)
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
वेब न्यूज पोर्टल विश्वात निष्पक्ष आणि निर्भिड वृत्त प्रसारित करून वाचकांच्या मनामध्ये अग्रस्थान पटकवलेल्या ”महाईन्यूज”च्या पिंपरी-चिंचवड कार्यालयात आज पर्यावरणपूरक गणपती बाप्पांच्या मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. समाजाला पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी तुरटीपासून बनविलेल्या गणरायांचे थाटामाटात स्वागत करून कार्यालयातील ”टीम महाईन्यूज”ने जल्लोषात गणरायाची आरती केली.
गणरायांच्या आगमनाची उद्योगनगरीत घराघऱात उत्सुकता लागली होती. ”महाईन्यूज”च्या टीमची देखील कालपासूनच लगबग सुरू होती. आज बाप्पा विराजमान होणार असल्याने सकाळीच पूर्वतयारी करण्यात आली. विविधरंगी पोषाख परिधान करून कर्मचारी कार्यालयात हजर होते. महिला कर्मचा-यांनी साडी परिधान करून पुजेची संपूर्ण तयारी केली होती. बाजारातून आणलेल्या विविधरंगी फुलांची सजावट करण्यात आली. धूप, दीप, अगरबत्ती आदी पूजेच्या वस्तुंनी आरतीचे ताट सजविण्यात आले. आज प्रतिष्ठापना असल्याने गणरायाची पहिली आरती कार्यालयातील कर्मचा-यांच्या हस्ते करण्याचे नियोजन करण्यात आले.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/IMG-20200822-WA0015-1024x462.jpg)
आज दुपारी कार्यालयातील सर्व कर्मचा-यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचा आदर्श घडविण्यासाठी तुरटीपासून बनविलेल्या गणरायांचे थाटामाटात स्वागत केले. गणपती बप्पा मोरया…चा जयघोष करत सर्वांनी गणरायाला वंदन केले. आपापसात सामाजिक अंतर ठेवून बाप्पांची प्रतिष्ठापना करण्यात आली. फुलांच्या सजावटीने तयार केलेल्या गालीच्यामध्ये लाकडी पाटावरील मखमलीत आसनावर गणराय रुबाबत विराजमान झाले होते. कार्यालयातील सर्व कर्मचा-यांनी पवित्र वातावरणात गणपतीची आरती केली. सर्वांनी गणरायाचे भक्तीभावाने दर्शन घेतले. करोनाच्या पार्श्वभूमीवर तुरटीपासून बनविलेली गणरायांची मुर्ती बसवून ”महाईन्यूज”ने पर्यावरण संवर्धनाचा एक आदर्श निर्माण केला आहे.
यावेळी ”महाईन्यूज”चे व्यवस्थापकीय संपादक अधिक दिवे, संपादक अमोल शित्रे, कार्यकारी संपादक विकास शिंदे, डिजिटल हेड नागेश सोनुले, निवेदिका मयुरी सर्जेराव, ग्राफिक डिझायनर रमेश पाटील, अम्रपाली गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते.