मराठी राजभाषा दिनानिमित्त मनसेची शहरात स्वाक्षरी मोहीम
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/02/sachin-chinkhle.jpg)
- गटनेते तथा शहराध्यक्ष सचिन चिखले यांचा पुढाकार
- शहरातील विविध चौकांमध्ये घेणार उपक्रम
पिंपरी / महाईन्यूज
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उद्या २७ फेब्रुवारी रोजी ‘मराठी राज्यभाषा दिन; मराठी माणसाचा अभिमानाचा दिवस’ या संकल्पनेद्वारे विविध कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव पाहताना गर्दी न करता भोसरी, पिंपरी, चिंचवड विधानसभा मतदारसंघातील चौका-चौकात मराठी स्वाक्षरी मोहीम घेण्यात येणार आहे. शहरातील जे शिक्षक मराठी भाषा शिकवतात त्यांचा सत्कार, कला, क्रीडा, साहित्य व पत्रकार, तज्ञ मंडळी ज्यांनी मराठी भाषेला नेहमीच अग्रगण्य समजले आहे, अशा मान्यवरांचा देखील सत्कार करण्यात येणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहराचे प्रभारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष गणेश सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये २७ फेब्रुवारी ते ३१ मार्च ऑनलाईन मराठी स्वाक्षरी मोहीम घेण्यात येणार आहे. यामध्ये ज्याची सुंदर सही असेल, त्यांना बक्षीस देण्यात येणार आहे. आपली सुंदर अशी सही ९८२३०२३४४४ या व्हाट्सअप नंबरवर पाठवा व भरघोस बक्षिसे जिंका, अशी माहिती मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी सांगितली.