Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
मराठी भाषेसाठी आझाद मैदानावर आंदोलन, साहित्य परिषदेचा पाठिंबा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/06/images-7.jpg)
पिंपरी, (महाईन्यूज) – मराठी भाषेच्या उन्नतीसाठी सोमवारी (दि. २४) मुंबई येथे आझाद मैदानावर धरणे आंदोलन होणार आहे. या आंदोलनाला महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखेने पाठिंबा दर्शविला आहे. अशी माहिती अध्यक्ष राजन लाखे यांनी दिली.
- कार्यकारणीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत मराठी भाषा सक्तीसाठी व विकासासाठी विकास प्राधिकरण कायदा, मराठी भाषा भवन निर्माण, अभिजात भाषा दर्जा आदी विषयांवर चर्चा होऊन त्यासाठी एकमताने ठराव मंजूर करण्यात आला. महाराष्ट्रातील संस्थांनी एकत्र येऊन मराठीच्या भल्यासाठी मुक्त व्यासपीठ स्थापन केले आहे. या व्यासपीठाच्या सुकाणू समितीचे अध्यक्ष मधू मंगेश कर्णिक असून त्यांच्या अध्यक्षतेखाली आजाद मैदानावर धरणे आंदोलन अंतर्गत मुख्यमंत्र्याना निवेदन देण्यात येणार आहे.
इंग्रजीसह इतर माध्यमाच्या सर्व शाळांमध्ये पहिली ते बारावीपर्यंत मराठी सक्तीसाठी कायदा करणे, कर्नाटक व तामिळनाडू सरकारच्या धर्तीवर मराठी भाषा विकास प्राधिकरणची स्थापना करणे, मराठी भाषा भवन निर्माण करणे, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्यासाठी शासनाने पाठपुरावा केंद्राकडे पाठपुरावा करणे आदी मागण्या शासनाकडे मांडण्यात येणार आहे.
- अध्यक्ष राजन लाखे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत मराठी आंदोलनास पाठींबा देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. त्यावेळी कार्याध्यक्ष विनीता ऐनापुरे, डॉ. रजनी शेठ, विनिता, नाना दामले, दत्तू ठोकळे, माधुरी मंगरुळकर, किरण लाखे उपस्थित होते. यावेळी पंतप्रधानांना शहरातील मराठी भाषिकांच्या सह्यांचे निवेदन पाठविण्याचे निश्चित करण्यात आले.