breaking-newsपिंपरी / चिंचवड

मराठा आरक्षणासाठी उद्या चिंचवडगाव बंदचे आवाहन

पिंपरी ( महा ई न्यूज )-  पिंपरी चिंचवड शहर सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणासह अन्य प्रलंबित मागण्यासाठी रविवारी चिंचवडगाव बंदची हाक देण्यात आली आहे. 

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, कोपर्डी हत्याकांडातील नराधमांना त्वरित फाशी द्यावी, या विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सरकारकडे वारंवार पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र, शासन स्तरावर याबाबत निर्णय होत नसल्याने मराठा समाजामध्ये असंतोषाचे वातावरण आहे. आपल्या या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने रविवारी चिंचवड बंदची हाक देण्यात आली आहे. दरम्यान, रविवारी सकाळी साडेआठ वाजता चाफेकर चौक, चिंचवडगाव येथून एका रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button