breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मनसेचे चित्रपटगृहांना आठ दिवसाचे अल्टिमेटम ; अन्यथा खळ्ळखट्याक

पिंपरी –  पिंपरी चिंचवड शहरातील मल्टिप्लेक्स, चित्रपटगृहामध्ये खाद्य पदार्थांची विक्री जादा दराने केली जाते. येत्या आठ दिवसात शहरातील सर्व मल्टिप्लेक्स चालकांनी खाद्यपदार्थाचे दर कमी करावेत, अन्यथा मनसे स्टाईने आंदोलन करण्यात येईल. असा इशारा शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी पत्रकार परिषदेत दिला. 

यावेळी महापालिकेत झालेल्या पत्रकार परिषदेला मनसेचे राजू सावळे, बाळा दानवले, रुपेश पटेकर, संजय यादव, सीमा बेलापूरकर, अश्विनी बांगर, संगीता देशमुख, अनिता पांचाळ, स्नेहल बांगर  आदी उपस्थित होते.

चिखले म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहरात मल्टिप्लेक्स व चित्रपट गृहांमध्ये खाद्य पदार्थाची विक्री जादा दराने केली जाते. यावर सरकार निर्बंध घालू शकत नाही का? असा सवाल देखील मुंबई उच्च न्यायालयाने उपस्थित केला होता असे सांगत चिखले म्हणाले, शहरातील चित्रपट गृहांमध्ये महाराष्ट्र चित्रपट कायदा 1953 महाराष्ट्र चित्रपट नियम 1966 अंतर्गत असलेल्या नियमाचे पालन केले जात नाही. या नियमाअंतर्गत खाद्य पदार्थाच्या भावावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. शहरातील चित्रपट गृहामध्ये प्रेक्षकांना त्यांच्या जवळील खाद्य पदार्थ प्रेक्षागृहामध्ये नेण्यास विरोध केला जातो. हे अत्यंत चुकीचे आहे. येत्या आठ दिवसात खाद्य पदार्थाचे दर कमी करावेत. तसेच त्याचबरोबर पार्किंगची देखील सेवा मोफत करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. येत्या आठ दिवसात न केल्यास  मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button