Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
भाजप शहराध्यक्षाचा फोन… अन् उपमहापौर तुषार हिंगे यांचा तडकाफडकी राजीनामा

पिंपरी | महाईन्यूज
पिंपरी चिंचवड महापालिकेचे उपमहापौर तुषार हिंगे यांनी आज राजीनामा दिला. महापौर माई ढोरे यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला. महापौरांनी त्यांचा राजीनामा स्वीकारून पुढील कारवाईसाठी पाठविला आहे.
एवढ्या तडकाफडकी राजीनामा दिल्याने महापालिका वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. भाजपचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांनी उपमहापौर हिंगे यांना फोन करून राजीनामा देण्यास सांगितल्यामुळे हिंगे यांनी तडकाफडकी उपमहापौर पदाचा राजीनामा महापौरांकडे सुपूर्द केला आहे.




