breaking-newsताज्या घडामोडीपुणे

दिवाळीत अग्निशमन दलाकडून जनजागृती मोहिम; सुरक्षित दिवाळी साजरी करण्याचे आवाहन

पुणे : दिवाळीत फटाक्यांमुळे आग लागण्याच्या घटना घडतात. यापार्श्वभूमीवर अग्निशमन दलाकडून जनजागृती मोहिम राबविण्यात यावे. दिवाळी सुरक्षित साजरी करावी, असे आवाहन अग्निशमन दलाकडून करण्यात आले आहे. अग्निशमन दलाच्या गाड्यांमधील ध्वनीवर्धकावरुन नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे.

दिवाळीत शहर, तसेच उपनगरात मोठ्या प्रमाणावर आतषबाजी करण्यात येत आहे. आतषबाजीमुळे आग लागण्याच्या घटना घडतात. घराच्या छतावर साचलेला पालपाचोळा पेट घेतो, तसेच झाडांना आगी लागतात. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शहरात सर्वाधिक आग लागण्याच्या घटना घडतात. दिवाळीत फटाके वाजविताना काळजी घेतल्यास गंभीर स्वरुपाच्या घटना टाळता येऊ शकतात, या विचाराने अग्निशमन दलाचे प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांच्या संकल्पनेतून यंदा दिवाळीत जनजागृती माेहिम राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

हेही वाचा    –      ‘एकनाथ शिंदेंनी पक्षाचं चिन्हआणि नाव घेतलं, ते चुकीचं केलं’; अमित ठाकरेंचं विधान 

अग्निशमन दलाचे अधिकारी आणि जवानांनी वाहनाताली ध्वनीवर्धकावरुन नागरिकांना आवाहन करत आहेत. फटाक्यामुळे आग लागू नये म्हणून घ्यायची काळजी, आग लागल्यास उपाययोजना याबाबतची माहिती ध्वनीवर्धकावरुन देण्यात येत आहे. एखादी दुर्घटना घडल्यास अग्निशमन दलाचे जवान सज्ज आहेत. अग्निशमन दलाच्या मुख्य अग्निशमन केंद्रासह शहर, तसेच उपनगरातील अग्निशमन केंद्रातील जवान तातडीने घटनास्थळी रवाना होऊन आग आटोक्यात आणतील. नागरिकांनी सूचनांचे पालन केल्यास दिवाळीत सुरक्षित, तसेच आनंदी होईल, असे अग्निशमन दलाचे प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांनी सांगितले.

दिवाळीतील आगीच्या घटना

वर्ष            आगीच्या घटना

२०२१            २१

२०२२            १९

२०२३          ३५

तातडीने संपर्क  साधण्याचे आवाहन दिवाळीत अग्निशमन दलाचे दूरध्वनी क्रमांक व्यस्त असतात. आग लागण्याची घटना, तसेच आपत्कालिन परिस्थितीत तातडीने अग्निशमन दल नियंत्रण कक्ष (दूरध्वनी १०१, ०२०-२६४५१७०७, ९६८९९३५५५६) या क्रमांकावर संपर्क साधावा.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button