बो-हाडेवाडी गृहप्रकल्पाचा प्रस्ताव आयुक्ताकडून मागे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/images-7.jpg)
पिंपरी ( महा ई न्यूज )- महापालिकेच्या वतीने बोर्हाडेवाडी येथे राबविण्यात येणार्या पंतप्रधान आवास योजनेतील गृहप्रकल्पाचा प्रस्ताव आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी बुधवारी (दि.25) झालेल्या स्थायी समिती सभेत मागे घेतला. त्यामुळे आता हा याबाबतचा फेरप्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.
स्थायी समितीच्या 18 जुलैला झालेल्या सभेत बोर्हाडेवाडीचा गृहप्रकल्पाचा दर पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणापेक्षा अधिक आहे. दोन्हीकडील कामाच्या दराची तुलना करून फेरप्रस्ताव दाखल करण्याची उपसूचना मंजुरी केली होती. मात्र, सभाशास्त्राच्या नियम 25 नुसार तो विषय दप्तरी दाखल झाल्याने किमान 3 महिने पुन्हा समितीसमोर सादर करता येणार नव्हता. ही बाब लक्षात आल्यानंतर आजच्या सभेत सदर विषय आयुक्तांनी मागे घेतला. तशी उपसूचनेत दुरूस्ती करावी, या उपसूचनेला समितीने मान्यता दिली. उपसूचनेतील या तांत्रिक सुधारणेमुळे आता लवकरात लवकरत फेरप्रस्ताव सादर करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.