breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

बो-हाडेवाडीतील 1 हजार 288 सदनिका प्रकल्पाच्या खर्चाला स्थायीची मान्यता

पिंपरी – प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गंत महापालिका क्षेत्रातील बो-हाडेवाडी येथे १ हजार २८८ निवासी सदनिका आर्थिक दुर्बल घटकांसाठी बांधण्यात येणार असून त्यासाठी येणा-या सुमारे ११२ कोटी १९ लाख रुपयांच्या खर्चासही शहरातील विविध विकास विषयक कामे करण्यासाठी येणा-या सुमारे ११५ कोटी ९० लाख रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

 

स्थायी समिती सभागृहात आज झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या. प्रभाग क्र.३५ भोसरी स.नं.१ मधील दवाखाना इमारतीसाठी बैठक व्यवस्था करणे व स्थापत्य विषयक कामे करण्यासाठी येणा-या सुमारे ७३ लाख ३८ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली. महापालिका मुख्य कार्यालय व इतर विविध कार्यालयांचे नेटवर्किंगचे दुरुस्ती व देखभाल कामकाज करण्यासाठी येणा-या सुमारे १ कोटी ३८ लाख ९० हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.

 

मनपाच्या नागरी सुविधा केंद्र संगणक प्रणाली देखभाल दुरुस्ती करण्यासाठी येणा-या सुमारे २२ लाख ४१ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली. मनपाच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागाकडील प्रभाग अ,ब आणि फ पंपीग स्टेशनमधील स्थापत्य विषयक कामे करण्यासाठी येणा-या सुमारे ४५ लाख १७ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली. मनपाचे उद्यान विभागाकडील जिजाऊ पर्यटन केंद्र भाग १ व २ पार्वती उद्यान चिंचवड देखभाल व संरक्षण करण्यासाठी येणा-या सुमारे ४१ लाख १४ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.

 

महापालिकेच्या मिळकतीवर व सार्वजनिक ठिकाणी अनधिकृतपणे लावणेत येणा-या हँडबिल्स, कागदी भिंती पत्रके लावून शहराचे विद्रुपीकरण करणा-या जाहिरात धारकांना ७५० रुपये प्रती चौरस मीटर इतके प्रशमन शुल्क आकारणेस मान्यता देवून अंतिम मान्यतेसाठी हा विषय महापालिका सभेकडे पाठविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button