breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

बोरघाटात रेल्वे मार्गावर दरड कोसळली, मोठा अपघात टळला

पुणे – लोणावळ्याजवळच्या रेल्वे रुळावर अचानक दरड कोसळल्याने मोठा अपघात टळला आहे. 13 जून रोजी संध्याकाळी 8 वाजताच्या दरम्यान ही दरड रुळावर कोसळली. रेल्वे रुळावर दरड कोसळल्यानं अनेक मेल आणि एक्स्प्रेस प्रभावित झाल्या आहेत. दरड कोसळत असतानाची चित्रे सीसीटीव्हीत कैद झाली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर गुरुवारी रात्री लोणावळ्याजवळ दरड कोसळली. ठाकूर वाडी ते मंकीहिल दरम्यान दरड कोसळली होती. पेट्रोलिंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी वेळीच याबाबत माहिती दिल्याने सुदैवाने मोठा अपघात टळला आहे.या दुर्घटनेमुळे मुंबई-कोल्हापूर 11023 ही सह्याद्री एक्स्प्रेसही दोन तासांनी उशिरानं धावत होती. दरड हटवण्यात आली असून, इतर रुळांचीही तपासणी केली जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button